डॉ. मीनल कातरणीकर - लेख सूची

अभिजात भारतीय दर्शनांतील शरीर-मन समस्येचे स्वरूप

उपोद्धात शरीर-मन-समस्या ही तत्त्वज्ञानातील अनेक मूलभूत समस्यांपैकी, प्राचीन काळापासून चर्चेत असलेली आणि आजही मेंदू-विज्ञानाच्या प्रगतीमुळेच निराळेच वळण घेतलेली अशी समस्या आहे. आणि ती बहुपेडी आहे. म्हणजे, त्या समस्येचे उत्तर शोधता-शोधता तिच्या अवतीभवतीच्या अनेक समस्या-उपसमस्या एकदम सामोऱ्या येतात व त्यांची उकल केल्याशिवाय शरीर-मन-समस्येची सोडवणूक करणेही अशक्य होते. अर्थात तत्त्वज्ञानातील प्रत्येक समस्येसंदर्भात हीच परिस्थिती आढळते, व तरीसुद्धा …